राहाता येथे वचनपुर्तीसोहळा कार्यक्रमाचे आयोजन

ahmednagar-vachanpurti-sohala

अहमदनगर (प्रतिनिधी संजय महाजन) : 5 वर्षात जो जो त्रास आम्हाला देण्यात आला त्याचा हिशोब आम्ही वहीत लिहुन ठेवला आहे योग्यवेळी जनतेसमोर हिशोबाची वही उघडु चार दिवस सासुचे असतात तर चार दिवस सुनेचेही असतात हेही आमच्या विरोधकांनी लक्षात ठेवावे असे प्रतिपादन राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी वचनपुर्ती सोहळा कार्यक्रमात बोलताना केले.

राहाता नगरपालिकेत नगराध्यक्ष 5 वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाला याबद्दल नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व सत्तारुढ गटाचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी वचनपुर्ती सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी, नानासाहेब सदाफळ, डॉ.विजय सदाफळ,अनंतराव गांधी,शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश सोमवंशी,मनसेचे गणेश जाधव,सुभाष बोठे,प्रजापिता ब्रम्हकुमारी वर्षा दीदी, सुरेशराव गाडेकर दत्तात्रय सदाफळ, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अनिल पिपाडा,आबा मेचे,सुरेंद्रजी सांड, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ जगताप,बजरंग दालाचे शुभम मुर्तडक,प्रफुल्ल पिपाडा,कमलनयन टाकी,अमोल खापटे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा यांचा उल्लेखनिय विकासकामे केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांच्याहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जॉगिंग ट्रँक व रस्त्याचे डांबरीकरणाचे उदघाटन कऱण्यात आले. तसेच नाना-नानी पार्क व स्व.गोपीनाथजी मुंडे उद्यान चे उदघाटन करण्यात आले.यावेळी बोलताना सौ.ममता पिपाडा म्हणाल्या की आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी दुस-यांना जनतेतुन नगराध्यक्षा झाले व काम करु शकले. सामान्य जनतेची साथ होती म्हणुन आम्ही हे सर्व करु शकलो. जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकुन मला दुस-यांना जनतेतुन निवडुन दिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. विकास कामे करुन 10 वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यभार पुर्ण करु शकलो याचे आम्हाला समाधान आहे. राहात्याच्या वैभवात नक्कीच भर पडेल अशी कामे झाली आहे. हे सामान्य जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे.

सर्वसामान्य नागरीक आमच्याकडे कामे घेवुन येतात त्यांची कामे प्रामाणिकपणे पुर्ण कऱण्यात आम्हाला आनंद मिळतो. माझ्या 10 वर्षाच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळात वेगवेगळे अनुभव आले अनेक अडथळे अडचणींना समोरे जावे लागले. एक दिवसही विरोधकांना शांत झोप लागली नाही. नगरपालिकेच्या माध्यमातुन विकास काय असतो हे आम्ही आमच्या कामातुन दाखवुन दिले.

माझ्या विरोधात अनेक कट कारस्थाने कऱण्यात आली. आम्हाला अपात्र कऱण्यासाठी खोटे अहवाल तयार करुन उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली त्यासाठी कोणी रसद पुरवली याची सर्व माहिती आम्हाला आहे. योग्य वेळी त्याचाही खुलासा करु. 5 वर्षात जो जो त्रास देण्यात आला त्याचा हिशोब आम्ही लिहुन ठेवला आहे योग्यवेळी जनतेसमोर हिशोबाची वही उघडु. 4 दिवस सासुचे असतात तर 4 दिवस सुनेचेही असतात हेही आमच्या विरोधकांनी लक्षात ठेवावे.

कोणी कितीही प्रयत्न केले,कटकारस्थाने केली तरी लोकांच्या ह्रदयात असलेले आमचे स्थान कोणही हिरावुन घेवु शकणार नाही. लोक आम्हाला म्हटले कोट्यावधींची कामे केली त्याच्या पाट्याही तुम्ही लावल्या नाही मी त्यांना म्हटलो, फार वेळेस लोकांनी उद्घाटनांसाठी बोलवले पण तरी आम्ही उद्घाटने केली नाही. फक्त कामे करीत राहिलो. कामे करीत असताना राष्ट्रपुरुषांची नावे दिली पाहिजे हि भावना मनात आली. नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सभागृहाला महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर,लोकशाहिर आण्णाभाऊ साठे,सावित्रिबाई फुले या राष्ट्रपुरुषांच्या नावाला विरोध करायचा म्हणुन नगरसेवकांना सहलीला पाठवले गेले. ही नावे द्यायला सहकार्य केले असते तर आकाश कोसळले असते काय. एवढा आटा-पिटा कशासाठी हे जनतेच्या लक्षात आलेले आहे. आम्ही गावच्या विकासासाठी शांत राहीलो आम्हाला डीवचण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देवु कारण आता राजेंद्र पिपाडा मोकळे आहेत. असे आव्हान विरोधकांना यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी केले.

विजय नेहमी सत्याचाच होत असतो.आम्ही नेहमी पॉजिटीव्ह गोष्टींकडे लक्ष देत गेलो त्यामुळे आमची काम करण्याची उमेद कधीही कमी झाली नाही.राहाता शहरात वाड्यावस्त्यांवर जे नागरीक राहतात त्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित जास्तीत जास्त डांबरीकरणाचे रस्ते आम्ही आमच्या कार्यकाळात करु शकलो, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. राहाता शहराची सर्वांत मोठी पिण्याच्या पाण्याची योजनेचे कामही अंतिम टप्प्यात असुन येत्या दीड दोन महिन्यात ती योजना पुर्ण होईल,शहरात विविध गार्डनची आमच्या काळात पुर्ण झाली.शहरात 2 ज़ॉगिंग ट्रँक केले,स्मशानभुमीचे काम अंतिम टप्प्यात आहे.वॉटर एटीएमच्यामाध्यमातुन शुद्ध व थंड पाणी उपलब्ध केले,भुयारी गटार योजनेचे काम काही दिवसात संपेल. काम करताना मी कुठलाही भेदभाव न करता कामे करु शकले याचे मला समाधान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आबंडेकर, सावित्रिबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आदी महापुरुषांची नावे देण्यासाठी आमचे विरोधक विरोध करु शकतात याचे मला आश्चर्य वाटते.

यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश सोमवंशी,मनसेचे गणेश जाधव, अनंतराव गांधी,श्रृती पिपाडा,मयुर कुंभकर्ण,वंदना पिपाडा,नवनाथ थोरे, ट्विंकल पिपाडा, नवनाथ जगताप आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी पारंपारीक वाद्य सनई चौघड्यांच्या सुरात ग्रामदैवत विरभद्र महाराज मंदिरातुन सभेच्या ठिकाण पर्यंत डॉ.राजेंद्र पिपाडा व नगराध्यक्षा ममता पिपाडा यांची मिरवणुक काढण्यात आली. पेढे भरुन तोंड गोड करुन कार्यक्रमाचा समारोप कऱण्यात आला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here