नवले पुलाजवळ दुचाकीला बोअरवेल ट्रकची धडक

navale-bridge-accident

पुणे (जिल्हा संपादक संजय घम) : दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवले पुलाजवळ घडली.


मिळालेली माहिती अशी की, पूजेचे साहित्य घेऊन दुचाकीवरून निघालेले वृद्ध विजय रंगनाथ कुलकर्णी (वय ७०) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान नवले पुलाकडून कात्रज दिशेने जात होते.


दरम्यान बोअरवेल ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ह्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अण्णा वडेवाले हॉटेल समोर घडली. अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत. विजय कुलकर्णी हे ऑरा सोसायटी, निखिल गार्डन जवळ, वडगांव बुद्रुक, पुणे येथील रहिवासी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here