विनापरवाना पिस्टल बाळगणारा सराईत गुन्हेगार कोंढवा पोलिसांकडून जेरबंद

kondhava-police-arrested

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि मॅगझीनमध्ये तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. कोंढवा पोलिसांनी ही कारवाई खडी मशीन परिसरात केली.

या प्रकरणी पोलिसांनी मनोज उर्फ सारस रमेश खाडे (वय-२९ रा. १४४/पी, सत्यवीर मित्र मंडळा जवळ, शिवदर्शन, पुणे) याला अटक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व योगेश कुंभार यांना खडी मशी परिसरात बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील मनोज खाडे हा कात्रज ते उंड्री रोडवर थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन सापडली. मॅगझीन काढून पाहिली असता त्यामध्ये तीन जिवंत काडतुस होते. पोलिसांनी आरोपीकडून पिस्टल आणि काडतुस असा एकूण ५० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे गोकुळ राऊत, यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, दिपक जडे, अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी यांच्या पथकाने केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here