पुणे (महाराष्ट्र राज्य उपसंपादक प्रभाकर निकम) : मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक मा. नजीब सैद यांना मानवरत्न हा मनाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांच्या हस्ते नजीब सैद यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नजीब सैद हे प्रसिद्ध उद्योजक असून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य मोठे आहे. गोरगरीब जनतेला, छोटे – मोठे उद्योग व्यवसाय करणाऱ्या अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या प्रभावी कार्याची दखल घेऊन त्यांना मानवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर निकम, हेमंत निवंगुणे, कपिल राक्षे, डॉ. किरण घोलप, रुद्र क्षीरसागर आदि. उपस्थित होते.







