कंपनीतील सामान चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक

midc-police-arrested

जळगाव (क्राईम रिपोर्टर शाहीद खान) : दिनांक 01/01/2022 रोजी रात्री 08:00 वा. ते दिनांक 02/01/2022 रोजी सकाळी 08:00 वा. च्या दरम्यान जळगाव एम.आय.डी.सी. परीसरातील सेक्टर एच 22/2 येथे असलेल्या एस.एस.डी. फुडस या कंपनीच्या आवारातुन 1) 15,000/- रु किंमतीच्या 03 मोठया मोटार, 2) 6,000/- रु किंमतीचे लोखंडी दातेरी 03 गिअर 3) 5,000 /- रु किंमतीची सुमारे 24 इंच व्यास असलेली पुल्ली 4) 10,000/ रु किंमतीची सुमारे 20 इंच व्यास असलेल्या 10 पुल्ली 4) 2,000/-रुकिंमतीची वेल्डींग मशीनची वायर 5) 3,000 /- रु किंमतीचे लोखंडी स्टॅण्ड असा एकुण 41,000/- रु किंमतीचा मुद्येमाल चोरुन नेला होता. सदर बाबतीत किशोर रमेशलाल कटारीया, वय 38 वर्ष, व्यवसाय व्यापार, रा. 31, गणपती नगर, जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक श्री. प्रताप शिकारे सो. यांना माहीती मिळाली कि, सदरची चोरी ही एम.आय.डी.सी. पो.स्टे. चा रेकॉर्डवरील आरोपी नामे दिनकर उर्फ पिन्या रोहीदास चव्हाण, वय 22 वर्ष, रा. मच्छी मार्केट, सुप्रीम कॉलनी, जळगाव याने केलेली आहे. म्हणुन त्याचा शोध घेवून त्यास स.फौ. अतुल बंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद किशोर पाटील, मुकेश पाटील, सुधीर सावळे, सचिन पाटील, मुदस्सर काझी अशांनी त्यास सुप्रीम कॉलनी परीसरातुन ताब्यात घेतले असुन त्याने गुन्हा केलयाचे कबुल केले असुन त्यास या गुन्हयाकामी अटक करण्यात आली आहे.


सदरचा आरोपी मजकुर हा पोलीस स्टेशन चा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचेवर 16 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यास आज रोजी मा. न्यायमुर्ती ए.एस. शेख यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीतास दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सरकार पक्षातर्फे मा. सरकारी अभियोक्ता स्वाती निकम यांनी कामकाज पाहीले. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here