जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अल्ताफ खान (मुळगाव-घाट रोड चाळीसगाव) यांचे चिरंजीव अजलान खान याने आज २६ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षकांसारखा पोशाख घालून पोलीस अधीक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली.
वडील पोलीस सेवा बजावत असतांना लहानपणी वडिलांचे कर्तव्य बघून चिरंजीव अजलान खान अल्ताफ खान याने आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांची आज भेट घेऊन दोघांशी हितगुज केले.
याप्रसंगी अजलान याची इच्छाशक्ती बघून सर्व चकित झाले व उपस्थित मान्यवरांनीदेखील त्याचे कौतुक करत त्यास पुढील आयुष्य व वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव मला एस.पी. व्हायचं आहे; प्रजासत्ताकदिनी लहानग्या अजलान अल्ताफ खानचा निर्धार







