हिंगणे बु।। येथे महाराजस्व अभियानासंदर्भातील बैठक संपन्न; रस्त्याच्या कामाचे लोकार्पण

hingane-budruk

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर जगदीश सुर्यवंशी) : हिंगणे बु ता जामनेर येथे तहसीलदार जामनेर अरुण शेवाळे याच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व अभियानाअंतर्गत हिंगणे बु तलाठी फिरोज खान मंडळ अधिकारी संजय भावसार यांनी शेतकऱ्याची मिटींग घेऊन मार्गदर्शन केले.

हिंगणे ते कंडारी रस्त्यालगत असलेले शेतकरी एकत्र आले व प्रत्येकी १५ हजार रुपये जमा करून दोन लाख रुपये जमा केले व जो रस्ता ३० ते ४० वर्षापासून खराब होता, जेथे बेल गाडी सुद्धा व्यवस्थित जात न होती तेथे आता १२ टायरची गाडी जायला लागली या कामाचे लोकार्पण मंडळ अधिकारी संजय भावसार यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांनी रस्ता कंडारीपर्यत पक्का करून मिळण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली. या वेळी तलाठी फिरोज खान, पोलीस पाटील पूजा सूर्यवंशी, सरपंच शारदा चौधरी, उपसंपच सुपडू बावस्कर, सदस्य योगेश चौधरी, माजी सदस्य विजू पाटील, बाळू पवार व शेतकरी भास्कर पाटील, रमेश चौधरी, जगदीश सूर्यवंशी, नारायण चौधरी, धुरुवास सूर्यवंशी, विठ्ठल चौधरी, अशोक सूर्यवंशी, पुरुषोत्तम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here