रेल्वेच्या परीक्षेवरुन विद्यार्थी आक्रमक

train-burned-by-student

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेच्या परीक्षेवरुन राज्यामध्ये गोंधळाची स्थिती दिसून आली.भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यानी अनेक ठिकाणी इंजिनला आग लावली, पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


बिहारच्या बक्सर, मुझफ्फरपूर, नालंदा, नवादा, सीतामढी आणि आरामध्ये विद्यार्थ्यांनी रेल्वे ट्रॅक जाम केला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले खान सर आणि इतर काही संस्थांबरोबरच एकूण ४०० जणांविरोधात पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.


सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसेनंतर राज्याच्या राजधानीमधील पत्रकार नगर पोलीस स्थानकात अटकेत असणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबाच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेले आंदोलक विद्यार्थी हे या परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून आपण हिंसा आणि जाळपोळ केल्याची कबुली दिलीय. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासंदर्भात मोठं विधान केल्याचं सांगितलं जात आहे.


रेल्वे विभागातील आरआऱबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळील एका पॅसेंजर ट्रेनला आग लावली. विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनवरील पश्चिम गुमटी जवळ उभ्या असलेल्या सासाराम आरा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आग लावली. परीक्षा पॅटर्नमधील बदल आणि निकालातील गैरप्रकाराविरोधात नाराज विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करत रेल्वे ट्रॅक जाम केला होता. आंदोलनामुळं संबंधित ट्रॅकवरील वाहतूक बंद झाली होती. यानंतर सासाराम आरा पॅसेंजर ट्रेनला आऊटर जवळ थांबवण्यात आलं होतं. मात्र, विद्यार्थी तिथं पोहोचले आणि त्यांनी ट्रेनच्या इंजिनला आग लावून दिली. यानंतर इंजिन जळून गेलं. सितामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलनावेळी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here