इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने नव्याने सुरू करणेत येत असलेल्या ४ क्षेत्रीय कार्यालयांचा शुभारंभ

ichalkaranji-zone-office-opeing

इचलकरंजी (महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : शहरातील सर्व सामान्य नागरिक आपल्या विविध प्रकारच्या कामासाठी नगरपरिषद कार्यालयात येत असतात. शहराचा वाढलेला विस्तार पाहता अनेक ठिकाणच्या नागरिकांना नगर परिषदेचे मुख्य कार्यालयात येणे गैरसोयीचे वाटत होते.

नागरिकांची वेळ आणि श्रम वाचावेत हि बाब लक्षात घेऊन आणि नगरपरिषदे मार्फत पुरविण्यात येत असलेल्या प्राथमिक सुविधा नागरिकांना आपल्या परिसरात मिळाव्यात या दृष्टीने नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) या ठिकानास केंद्रस्थान गृहीत धरून शहराचे ४ विभाग करून नागरिकांच्या सोयीसाठी ४ विभागीय कार्यालये सुरू करणेचा संकल्प केला होता.

 

zone-office-opening-at-ichalkaranji

मुख्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली याकामी स्थापन केलेली विविध विभाग प्रमुखांची समिती गेले काही दिवस यासाठी विशेष परिश्रम घेत होती. त्यानुसार आज बुधवार दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सदर ४ क्षेत्रीय कार्यालयाचा शुभारंभ प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आला. क्षेत्रीय कार्यालयाचा शुभारंभ त्या परिसरातील सर्व सामान्य नागरिकांच्या हस्ते करणेचा निर्णय घेऊन मुख्य अधिकारी डॉ. ठेंगल यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला.

शहरातील ४ क्षेत्रीय कार्यालयांची ठिकाणे आणि त्याठिकाणी १) गावभांग क्षेत्रीय कार्यालय A – झोन (जुनी नगरपरिषद इमारत)क्षेत्रीय अधिकारी- राजेंद्र गवळी, सहा.क्षेत्रीय अधिकारी – विजय पाटील. २) छत्रपती शाहू महाराज क्षेत्रीय कार्यालय B – झोन (छत्रपती शाहू महाराज पुतळा ,शाळा क्रमांक २१ परिसर) क्षेत्रीय अधिकारी – स्वप्निल बुचडे. सहा.क्षेत्रीय अधिकारी – संजय हातळगे, ३) जवाहरनगर क्षेत्रीय कार्यालय C – झोन (बाळासाहेब माने सांस्कृतिक हॉल, सरस्वती हायस्कूल) क्षेत्रीय अधिकारी – राधिका हावळ, सहा.क्षेत्रीय अधिकारी – रफिक पेंढारी, ४) शहापूर क्षेत्रीय कार्यालय D – झोन (शहापूर चौक, नगर परिषद सांस्कृतिक हॉल ) क्षेत्रीय अधिकारी – प्रविण बैले, सहा.क्षेत्रीय अधिकारी – महादेव मिसाळ या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या परिसरात नगरपरिषदेकडुन प्राथमिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकां मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेवक मदन झोरे,राजु बोंद्रे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगर अभियंता संजय बागडे, जल अभियंता सुभाष देशपांडे, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here