पुणे (क्राइम रिपोर्टर शंकर संकपाळ) : गोपनीय बातमीदारामार्फत बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक, वाई पोलीस स्टेशन यांना बातमी मिळाली की, चांदणीचौक एम.आय.डी.सी. वाई ता.वाई जि.सातारा येथे असलेल्या निनावी पानटपरीमध्ये एक इसम बेकायदेशीररित्या गांजा या अमली पदार्थाची विक्री करीत आहे.
त्यानंतर बाळासाहेब भरणे,पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मिळालेल्या माहीती नुसार दिनांक 24/01/2022 रोजी सापळा लावून चांदणीचौक एम.आय.डी.सी. वाई ता.वाई जि.सातारा येथे असलेल्या निनावी पानटपरीवर छापा टाकला असता एक पुरुष पानटपरीमध्ये त्याचे कब्जात कि.रु.6000/-चा सुमारे 960 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगले स्थितीत मिळाली असून तो माल जप्त केलेला आहे.सदर बाबत वाई पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदर आरोपीस दिनांक 25/01/2022 रोजी मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांचे समक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने त्याची 15 दिवस न्यायालयीन कोठडी अभिरक्षा मंजूर केलेली आह.गुन्हयाचा पुढील तपास श्री.बाळासाहेब भरणे,पोलीस निरीक्षक,वाई पो.स्टे. हे करीत आहे.
सदरची कारवाई अजयकुमार बन्सल,पोलीस अधीक्षक सातारा, अजित बो-हाडे,अपर पोलीस अधीक्षक सातारा, तानाजी बरडे,उप विभागीय पोलीस अधिकारी फलटण चार्ज वाई विभपाग वाई,यांचे बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन,स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के,महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो.कॉ.किरण निंबाळकर,श्रावण राठोड,अमित गोळे,प्रसाद दुदुस्कर यांनी सहभाग घेतला होता.






