समाजकार्य करताना काही पथ्ये पाळली पाहिजेत – कुबेर जाधव

kuber-jadhav-nashik

नाशिक (वरिष्ठ जिल्हा प्रतिनिधी कुबेर जाधव) : ज्या लोकांना समाजकार्य करण्याची इच्छा असते त्यांनी काही पथ्य पाळली पाहिजेत असं नेहमी सांगितलं जातं. हे काम निरपेक्ष, निस्वार्थ आणि समर्पणाच असलं पाहिजे. सामाजिक कार्य करताना लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून करायचं नसत तर लोकांचं चांगलं व्हावं म्हणून करायचं असतं, हा मुद्दा आहेच पण त्या कामाव्यतिरिक्त आपलं वर्तन आपले विचार, आचार आणि उच्चार या बाबतीत देखील काही काळजी घ्यावी लागते..

एक
सामाजिक कार्यकर्त्यांनी कधीही पैशांच्या व्यवहारात पडू नये किंवा अडकू नये कारण पैसा आवश्‍यक असला तरी तो सामाजिक कार्यामध्ये अनेकदा लोकांच्या नाराजीचे कारण ठरू शकतो.

दोन
सामाजिक कार्यकर्त्यांना छोट्या-मोठ्या प्रलोभनाकडे दुर्लक्ष करायला हव् या प्रलोभना मध्ये क्वचित काही सामाजिक आशयअसल्याचे भासवले जाऊ शकते पण तो अंतिमता नुकसानदायी ठरत असते.

तीन
मोह आणि प्रलोभनं वगैरे गोष्टी खाजगी आयुष्यात ठीक असतात कारण ते आपल्या पुरते मर्यादित राहतात, पण सामाजिक कार्यातील प्रलोभनं हे लोकांच्या नाराजीचे कारण ठरू शकतात आणि त्यातून कार्याला बाधा येऊ शकते.

चार
सामाजिक कार्य करू पाहणाऱ्यांनी सतत फिरतीवर असलं पाहिजे, अर्थात जनसम्पर्क वाढवला पाहिजे जेणेकरून त्यांचा दृष्टिकोन विस्तारत राहतो संपर्क वाढतो आणि त्यातून हाती घेतलेले कार्य मोठे होण्यासाठी मदत होत असते.

पाच
सतत फिरतीवर असल्यामुळे तसेच जनसम्पर्क वाढल्यामुळे याचा आणखी एक फायदा असा असतो की एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे निर्माण होणारे प्रलोभणाचे धोके टळू शकतात, याचा विनासायास फायदा मिळतो.

सहा
सामाजिक कार्यासाठी पैसा लागतोच पण तो सन्मानाने मिळायला हवा, पैशासाठी उगाचच कोणाचा मिंधेपणा घेऊ नये. शिवाय आपले आचार विचार , आचार ,आणि चारित्र्य शुद्ध आणि निष्कलंक असायला हवे. त्यामुळे आपल्याकडे बोट दाखवण्याची कोणाची हिंमत होता कामा नये.

सात
सामाजिक कार्य करत असताना अनेक विचारांची लोकं भेटत असतात त्या सर्वांना एकत्र पुढे घेऊन जात असताना आपले कान हलके असता कामा नयेत,* मुखात साखर आणि डोक्यावर बर्फठेऊन काम करायला हवे…

आठ
सामाजिक कार्यात अनेक वेळा प्रतिकूल वातावरण निर्माण होते, तेव्हा संयम ठेऊन आशा प्रसंगावर मात करता आली पाहिजे…

नऊ
सामाजिक कार्य करत असताना आपण जे बोलतो त्या प्रमाणे आपले आचरण हे जाणीव पूर्वक झालं पाहिजे आणि त्यात सातत्य राखता आलं पाहिजे.

दहा
सामाजिक कार्याचा आपला उद्देश चांगला असला की या प्रवासात नक्कीच चांगली लोकं भेटत असतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे…
मी, माझं, माझ्यामुळे या शब्दांच्या ऐवजी आपण, आपलं, आपल्यामुळे, या शब्दांचा प्रयोग करायला हवा… कारण कोणते ही संघटन हे एका मुळे नव्हे तर एकीमुळे मोठे होत असते. लक्षात ठेवा: शिस्तीने, त्यागाने, प्रामाणिकपणे आणि एकीने केलेली चांगली कृती हेच कोणत्याही संस्थेसाठी, देशासाठी सामर्थ्याचे खरे स्त्रोत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here