मुंबई (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : इलेक्ट्रीक डीपीजवळील तारांत दोन दिवसांपासून पायात मांजा अडकलेले कबुतर अडकले होते. याबाबत परिसरातील राहिवाशांनी राजू कदम यांना फोन केला.
या फोनची तात्काळ दखल घेत राजू कदम घटनास्थळी पोहचले. परिस्थिती पाहिल्यानंतर इलेक्ट्रीक सप्लाय बंद केल्याशिवाय कबुतराची सुटका होणे शक्य नाही हे लक्षात येताच त्यांनी फायर ब्रिगेड, पक्षी मित्र संघटना, महावितरण विभागाच्या कार्यालयाला कळवले.

राजू कदम यांच्या विनंतीवर महावितरणचे श्री.कुंभार, श्री.पांचाळ तसेच आशिष पाटील, स्वप्निल बोराडे यांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवून परिश्रमाअंती त्या कबुतरांची सुटका केली. याबद्दल प्रतिनिधीक स्वरुपात स्वप्निल बोराडे यांचा सत्कारही राजू कदम यांनी केला.







