एक वर्षांपासून मिसिंग असणाऱ्या मुलगा व पत्नी यांची पतीकडून पोलादपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

poladpur-police-station

रायगड (महाराष्ट्र राज्य उपसंपादक संजय पवार) : एक वर्षांपासून मिसिंग असणाऱ्या मुलगा व पत्नी यांची पतीकडून पोलादपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

poladpur-missing-caseयाबाबत संदीप धोंडीराम पार्टे (वय २९, रा.कालवली, पो.धारवली, ता.पोलादपूर) यांनी नोंदविलेल्या फिर्यादीनुसार ८ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांची पत्नी सौ.सपना पार्टे (वय २५) व मुलगा सद्‌गुरु पार्टे (वय ४) याला सोबत घेऊन कपडे धुण्यासाठी कालवली येथील ओढ्यावर गेली असता, तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले आहे.

 



या प्रकरणी प्रभारी अधिकारी पोलादपूर सपोनि प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ए.जी.नटे हे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here