जळगाव (क्राईम रिपोर्टर शाहीद खान) : चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथुन सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे पाच लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चार दिवसांतच तपासाचा छड लावत आरोपींना ताब्यात घेतले असुन त्यांच्याकडुन ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील संतोष सुधाकर राठोड या शेतकर्याच्या घरी २३ जानेवारी रोजी सकाळी १२ ते सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोकड ५ लाख २८ हजार रुपयांच्या एवज चोरुन नेले होते. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात २४ जानेवारी रोजी फिर्याद दाखल करताच ग्रामीण पोलिसांनी चार दिवसात तपास करून अशोक चुनीलाल चव्हाण ( व संदीप उर्फ शेंडी भिमसिंग चव्हाण (वय- २८ ) दोघेही रा. कृष्ण नगर तालुका चाळीसगाव या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लांख २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिकारी रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्थानकाचे सपोनि रमेश चव्हाण, सपोनि हर्षा जाधव, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोहेका युवराज नाईक, पोना नितीन आमोदकर, पोना शांताराम पवार, गोर्धन बोरसे, पोना भूपेश वंजारी, व पोना प्रेम सिंग राठोड, आदींनी केली आहे. याबाबत सर्व स्तरातून ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहे.







