एक किलो ४०६ ग्रॅम सोने चोरी करणाऱ्या टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी केले गजाआड

vishrantwadi-police

पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : एक किलो ४०६ ग्रॅम सोने चोरी करणारे राजस्थानातील गुन्हेगार टोळीला गजाआड करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.


विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गुरनं ०५/२०२१ भा.द.वि.क. ३८१,१२०(ब),३४ प्रमाणे १०/०१/२०२२ रोजी दाखल असून, दाखल गुन्हयात फिर्यादी यांचे भैरवनगर येथील घरातुन एकुण २ किलो ८१ ग्रॅम ८५०/- मिली ग्रॅम एकुण किमंत ८३,२७,४१०/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी झाले बाबत गुन्हा दाखल आहे. वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्हयाचे तपास करणे कामी एक पथक तयार करण्यात आले. सदर पथकातील पोलिस अंमलदार दिपक चव्हाण, प्रफुल मोरे, संदिप देवकाते व शेखर खराडे यांनी गुन्हा घडल्यापासून अगोदरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदरचे आरोपी हे तीन दिवसापासून रेकी करत असल्याचे दिसून आले. सदरचे सीसीटीव्ही फुटेज हे फिर्यादी यांना दाखविले असता त्यांनी त्यातील मुकेश गोमाराम चौधरी (रा. राजस्थान) यास ओळखून माझे दुकानात काम करत असून तो १०/१२/२०२१ रोजी पासून सुटटीवर गावी राजस्थान येथे गेला असल्याबाबत सांगीतले.


तांत्रीक तपासाच्या व गुप्तबातमीदारांकडून मिळालेल्या माहिती अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक लहु सातपुते व स्टाफ यांचे एक पथक तयार करून राजस्थान येथे आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले. नमुद तपास पथकाने अहोरात्र परिश्रम घेवून आरोपींचा तांत्रीक विश्लेषणाव्दारे व बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सतत मागोवा घेवून आरोपी १) मुकेश गोमाराम चौधरी (वय २२ वर्षे, रा. गाव खुडाला फालना, ता.बाली जि. पाली, राज्य राजस्थान), २) रमेश रामलाल चौधरी (वय २७ वर्षे, रा.खुडाला, ता.बाली, जि. पाली, राजस्थान), ३) भगाराम गोमाराम चौधरी (वय ३८ वर्षे रा. खुडाला, ता. बाली, जि. पाली, राज्य राजस्थान), ४) जेठाराम कृष्णाजी चौधरी (वय ३८ वर्षे रा. खुडालाता. बाली, जि. पाली, राज्य राजस्थान) यांना अटक केली आहे. सदर गुन्हयामध्ये एका विधीसीत बालक याचाही सहभाग असून त्यांचेकडून एकूण १ किलो ४०६ ग्रॅम ९४० मिली ग्रॅम एकूण ५६,२७,७६०/- रुपये किमतीचे सोन्याचे दागीने हस्तगत केले आहेत. दाखल गुन्हयाचा तपास पोउनि लहु सातपुते हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here