नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : अचलपूरचे आमदार (सध्या राज्यमंत्री ) बच्चूभाऊ कडू यांनी निवडणूक अर्ज सादर करताना प्रतिज्ञा पत्रात मुंबईतील फ्लॅट बाबत माहिती दिली नाही म्हणून चांदुरबाजार कनिष्ट न्यायालयाने २ महिने शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड सुनावला आहे.
प्रत्यक्षात बच्चूभाऊ कडू यांनी आमदारांच्या सोसायटीमध्ये ४० लाख रुपये कर्ज काढून जो फ्लॅट घेतलाय,त्याचे सगळे डिटेल्स,म्हणजे कर्ज रक्कम,फ्लॅट माहिती ,फिटलेले कर्ज,अंगावर असलेली देय रक्कम हे सगळे डिटेल्स दिले मात्र केवळ फ्लॅट नंबर दिला नाही यासाठी कोर्टाने फ्लॅटची माहिती लपवल्याचे गृहीत धरून ना.कडू याना थेट शिक्षा आणि दंड ठोठावला आहे,हे सत्य असले तरी गजब आहे.
खालच्या कोर्टाचा निर्णय मान्य करून ना.बच्चूभाऊ कडू यांनी जिल्हा न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचे ठरवले आहे, बच्चू कडू यांच्या संदर्भात हा निर्णय आल्यामुळे सोशल मीडियात उथळ प्रतिक्रिया उमटत आहेत,अनेकांना वस्तुस्थिती माहीत नाही. ना.बच्चूभाऊ कडू यांचे राजकीय आणि व्यक्तिगत जीवन आजवर पारदर्शक राहिले आहे. त्यांची राजकीय अन सामाजिक कारकीर्द एका उंचीवर असताना आलेले हे संकटाचे ढग सुद्धा सत्याच्या प्रकाशाने वितळून जातील याची खात्री आहे.






