जळगाव (क्राईम रिपोर्टर असलम खान) : शहरातील विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला ८ रोजी मंगळवारी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एमआयडीसी परिसरातील श्रीराम पॉलीमर्स या कंपनी १३ हजार ६०० रुपये किंमतीच्या विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. निकिता राजेंद्र महाजन ( वय- १९) रा मेहरून जळगाव यांची एमआयडीसीच्या व्ही सेक्टर मधील श्रीराम पॉलीमर्स नावाची तयार करणे कामी लागणाऱ्या दाण्याची कंपनी आहे. १७ जानेवारी रोजी निकीता आणि त्यांची आई सल्भा महाजन यांनी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास कंपनीतल काम बंद करुन घरी गेले. या कालावाधी अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडुन कंपनीतुन पाण्याची मोटर, शिलाई मशिन, दाणा मशिनचे दोन कटर, १०० वायर, दाणा मशीनला आवश्यक असणाऱ्या तीन पुतली असा एकुण १३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी नेल्याचे २० जानेवरी रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले होते.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील संशयित आरोपी उमेश उर्फ साई सोनाजी आटे रा.सुप्रीम कॉलनी जळगांव हा एमआयडीसी परिसरात असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, योगेश बारी, यांनी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०० वाजता अटक केली. संशयित आरोपी गुन्ह्याची कबुली दिली. असुन त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळे ७ गुन्हा दाखल आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहे







