जळगाव (महाराष्ट्र राज्य सह संपादक मिर्झा अस्लम बेग शेमशेर बेग) : रावेर येथील तहसिलदार यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना मुस्लिम महिला यांचे वतीने कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यातील काही शाळा व कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींच्या हिजाब ( बुरखा ) परिधान करण्यावर व हिजाब घालून शाळा कॉलेजमध्ये येण्यास पासून मनाई करण्यात आली आहे . तसेच विद्यार्थीनींना त्रास देण्यात येत आहे . व त्यांचे शैक्षणिक कार्यात बेकायदेशीर रित्या अडथळे निर्माण केले जात आहे . याबाबतचे निवेदन देण्यात आले.
आपल्या कायदेशीर हक्कांवर येणाऱ्या बंदी व त्रासाच्या विरुध्द मुस्लिम विद्यार्थिनींनी महिलांनी सनदशीर मार्गाचा वापर करून आंदोलन करावे लागत आहे . हिजाब वर बंदी बाबतचे आदेश व निर्माण करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी बेकायदेशिर व भारतीय राज्य घटनेत नागरिकांना दिलेल्या हक्काचे व अधिकारांचा विरुद्ध आहे .

या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असुन . बेकायदेशीर घटनेच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करणेत यावी . हिजाब बंदी बाबतचे आदेश त्वरित रद्द करण्यात यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी आहे .







