जळगाव (क्राईम रिपोर्टर सलमान खान) : रात्री एमायडिसी भागातील एका बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या तिघांना काल रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने संची या वरून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पो.कॉ सतीश गर्जे यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी त्यांच्यासह सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना मुदस्सर काझी, पो.ना विकास सातदिवे, पो.ना सुधीर साळवे, पो.ना योगेश बारी, पो. कॉ. साईनाथ मुंढे, पेट्रोलिंग करीत असताना रात्री एमायडिसी मधील व्ही सेक्टर भागात ट्राईडन या बंद कंपनीत तीन ईसम अस्तीत्व लपवुन चेहऱ्याला दुपट्टे घालुन अंधारात फिरतांना दिसले आम्ही त्या कंपनीत गेल्यावर ते पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या पाठलाग करुन त्यांना पकडले
त्यांना विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देत होते त्यांना तन्वीर शेख चांद ( वर- २३ रा. दत्तनगर मेहरुण ) जुम्मा सलीम पिंजारी ( वय- ३१ रा. तांबापुरा महादेव मंदिर जवळ ) मजर खान सयाखत ( वय- २५ रा. पिंप्राळा हुडको ) अशी त्यांची नावे सांगितले त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम १२२ ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







