व्हिडिओ अपलोड केल्याचा राग; तांबापुरात मुलाच्या डोक्यावर लोखंडी रॉडच्या मारहाण

tambapur-hanamari-with-iron-rod

जळगाव (क्राईम रिपोर्टर शाहीद खान) : शहरातील तांबापुरा परिसरात व्हिडिओ तयार करून इंस्टाग्राम वर टाकत असल्याचा राग आल्याने १६ वर्षाच्या मुला तुला तीन ते चार जणांना टोळक्याने रॉडने मारहारण करत गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शादाब गफ्फार मणियार ( वय-१६ रा. टिपू सुलतान चौक तांबापुरा असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शादाब यांनी दवाखान्यात उपचार सुरू असताना दिलेल्या जवाबाच्या आधारे हल्लेखोरांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादाब गफ्फार मणियार हा त्याच्याकडे असलेल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ तयार करून ते इंस्टाग्राम वर अपलोड करत असतो. त्याने तयार केलेल्या व्हिडिओ च्या समीर हनिफ काकर या तरुणास आवडत नव्हते त्यामुळे त्याने शहादाबकडे खुन्नशी नजरेने बघत त्याला दमदाटी केली होती.


११ फेब्रुवारीच्या रात्री समीर काकर व त्याच्या इतर साथीदारांनी त्याला घराबाहेर बोलावले. शादाब घराबाहेर येताच त्याला समीर काकर याने हातातील लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या मारहाण शादाब गंभीर जखमी झाला.नातेवाईकांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. च्या दरम्यान त्याने दिलेल्या जबाबानुसार समीर काकर व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या वेळी तांबापुरा परिसरातील वातावरण तणावाखाली आले होते. मात्र लागलीच एमआयडीसी पोलिसांच्या शोध पथकातील साहयक फौजदार अतुल वंजारी, सय्यद इमरान, नितीन पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मुख्य हल्लेखोर समीर काकर यास अटक करण्यात आली आहे. तपास अधिकारी अल्ताफ पठाण यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर काकर यास न्यायालयात हजर केले. असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here