जळगाव जिल्ह्यातील आवार येथे ‘ज्ञानशक्ती वाचनालया’चे सनातनचे सद्गुरु जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

sanatan-sadguru-nandkumar-jadhav

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आपल्या ऋषिमुनींनी जीवनातील प्रत्येक अंगांचा साकल्याने विचार करून प्रत्येक प्राणीमात्राचे जीवन आनंदी व्हावे, यासाठी जे ज्ञान या मानवजातील विविध ग्रंथरूपांनी दिले, ते ज्ञान निश्चितच आजही आपल्याला सर्वांना उपयुक्त आहे. आरोग्य, आयुर्वेद, बालसंस्कार, व्यक्तीमत्त्व विकास, भारतीय संस्कृती, आचारधर्म, आहार तसेच हिंदु धर्म यांविषयीची ग्रंथसंपदा आवार गावात उपलब्ध झालेली असून या ज्ञानशक्तीचा लाभ येथील ग्रामस्थांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. येथे ‘ज्ञानशक्ती वाचनालया’च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनीही संबोधित केले.

या उपक्रमासाठी आवारचे सरपंच श्री. गोकुळ कोळी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समितीच्या कु. सायली पाटील यांनी केले. वाचनालयाचे काही नियम श्री. निखिल कदम यांनी समजावून दिले, तर आभार प्रदर्शन समितीचे श्री. उमेश जोशी यांनी मांडले.
श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पहिल्या ज्ञानशक्ती वाचनालयाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील आवार या गावात करण्यात आले. या वाचनालयात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले ग्रंथ ठेवण्यात आले असून हे ग्रंथालय विनामूल्य आहे. सदगुरु जाधव त्यांच्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, या ग्रंथांच्या अभ्यासातून केवळ त्या व्यक्तीलाच लाभ होईल, असे नसून त्यांचा लाभ संपूर्ण गावालाच होईल. गावातील एकोपा वाढीस लागेल, युवकांना योग्य दिशा मिळाल्याने व्यसनाधिनता अल्प होण्यास साहाय्य होईल, लहान मुलांना जीवनात योग्य आदर्श कोणते निवडावे, हे ही लक्षात येईल, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य साधना करून अल्पावधीत मनुष्य जन्माचे सार्थक करता येईल, असे अनन्यसाधारण लाभ या वाचनालयाचे होणार आहेत.

 


आपली भारतीय संस्कृतीनुसार ग्रंथ हे गुरू आहेत. ग्रंथ हे आपल्याला सदाचार, सुसंस्कार देतात. हे ग्रंथ म्हणजे आपली ज्ञानशक्ती असून त्याआधारे आपण आपले जीवनमान उंचावू शकतो. सुसंस्कृत समाज निर्मितीत ग्रंथांचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांपर्यंत ही आपली ज्ञानशक्ती पोचवणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे.
श्री. प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

एकेकाळी आपल्या देशात जी गुरुकुल पद्धती होती, तेव्हा मूल्याधिष्ठित शिक्षण दिले जायचे. वर्तमान इंग्रजळलेल्या शिक्षणपद्धती संस्कारक्षम राहिलेली नाही. ती पोकळी भरून निघावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. अशी ज्ञानशक्ती वाचनालये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 8 गावात आपण प्रायोगिक तत्वावर उघडणार आहोत. अन्य कुणाला त्यांच्या गावात असे ज्ञानशक्ती वाचनालय उघडायची इच्छा असल्यास अवश्य 9552426439 यावर संपर्क करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here