जळगाव (क्राईम रिपोर्टर शाहिद खान) : नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकासह फैजपुर पोलीस ठाण्यात पथकाने केलेल्या कारवाईत आज फैजपुर येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या पथकासह फैजपुर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गावठी पिस्तुल विकत घेणाऱ्या गावठी कट्टा मधील आरोपी विशाल प्रकाश पाचपांडे ( वय- २३ रा. गंगाराम प्लॉट मुन्सिपल हायस्कूलमागे भुसावल याला अटक केली आहे.
एपीआय सिद्धेश्वर आखेगांवकर, एएस आय बशीर तडवी, हे.कॉ रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने राजेश ब-हाटे, किरण चाटे, चेतन महाजन, उमेश सानप, आदींनी हि कारवाई केली आहे. आरोपीला कट्टा देणारा शिकलकर (नाव माहित नाही रा.पार उमर्टी ता. वरला जि. बडवाणी (मध्य प्रदेश)) फैजपुर पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून गावठी कट्टा २५,००० / रु, एक राउन्ड १०००,/ रु मोटर सायकल ३०,००० अशा एकुण ५६,०००/रु तसेच पुढील कारवाईत फैजपुर पोलीस स्टेशन करीत आहे.







