आर्थर रोड जेलमध्ये महिला कैद्याला मारहाणीसोबत केले अनैसर्गिक लैंगिक संबंध

arthur-road-jail

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : येथील आर्थर रोड कारागृहात अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इरशाद इस्लाम शेख असे आरोपीचे नाव आहे. तो गोवंडी येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे आर्थर रोड कारागृहातील सर्कल क्रमांक १ मधील बॅरेक क्रमांक ७ मध्ये ही घटना घडली. आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांची तक्रार पोलिसांना मिळाली होती. यामध्ये पोलिसांना कारागृहात लैंगिक शोषणाच्या कथित घटनेची चौकशी करण्यास सांगितले होते. पीडित मुलगी हरी ओशिवरा येथील रहिवाशी आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांनी तुरुंगाचा दौरा केला. त्यावेळी पीडितेचा जबाब नोंदवला. ती मागील काही दिवसांपासून तुरुंगात आहे.

आरोपी मोहम्मद इरशाद इस्लाम शेख हा बॅरेक क्रमांक सातमध्ये होता. त्याने पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान पीडितेला जोरदार मारहाण केली आणि तिला अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, अशी माहिती पीडितेची चौकशी करताना समोर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here