रायगड (दिप्ती पाटील) – रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत निर्सग चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नॅशनल फिशवर्क्स फोरम व महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती पाहणी दौरा केला.
रविवार दिनांक १४ जून २० रोजी पासून रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली येथील आडे, उटंबन, पाच पंढरी, हर्णेपाच येथिल मच्छिमार गावांना निर्सग वादळ नुकसान पाहणी संदर्भात महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS) चे कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष राजन मेहेर, सचिव उल्हास वाटकरे यांनी दौरा केला.आडे, उटंबन, पाच पंढरी, हर्णेपाच या मासेमारी गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडाले आहेत.उटंबन १५, पाच पंढरी ५, हर्णेपाच ६ एवढ्या मासेमारी नौकांचे नुकसान झाले आहे. तसेच चक्री वादळ झाल्यापासून विद्युत पुरवठा आजपर्यंत खंडित आहे. तसेच मच्छिमार सहकारी संस्थांच्या कार्यालये व डिझेल पंपाचे छप्पर उडाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील जेष्ठ मच्छिमार नेते मोतीराम पाटील, पांडुरंग चौले, बबन (अन्ना) नाईक कृती समिती चे रायगड जिल्हा अध्यक्ष, मनोहर बैले, बी. एन. कोळी व रत्नागिरी जिल्ह्यातील जेष्ठ मच्छिमार नेते पी. एन. चौगुले, दत्ता वनकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.शासनाला अहवानः सिमेंट पत्रे, सिमेंट इत्यादी घर दुरूस्ती सामान सामुग्री व्यापारी व दुकानदार दुप्पट दर आकारुन नागरिकांची पिळवणूक चालू आहे. त्यावर तत्काळ नियंत्रण आणावे व चक्री वादळ झाल्यापासून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. तो तत्काळ सुरू करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी या समितीकडे केली आहे.






