कोरोनापासून वाचवण्यासाठी दोन आयांनी केली मुलांची केली अदलाबदल!

सिक्कीम – कोरोना महामारीच्या काळात अशीच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. येथे दोन आया एकमेकांच्या मुलांसाठी यशोदा बनल्या आहेत. ही घटना आहे, सिक्किमची. या राज्यात कोरोना सर्वात शेवटी पोहोचला. येथे कोरोनापासून आपल्या मुलांचा बचाव करण्यासाठी दोन आयांनी एक खास युक्ती वापरली आणि आपल्या मुलांची अदलाबदल करून टाकली.
गंगटोक येथील एका महिलेच्या 27 महिन्यांच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाली. पण, महिलेचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला. हा चिमुकला राज्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना रुग्ण आहे. संक्रमणामुळे त्याला आईपासून वेगळे ठेवणे आवश्यक होते. मात्र, एवढ्या छोट्या मुलाला वेगळे ठेवणार कसे? हा प्रश्न होता. त्यामुळे आता, संक्रमित चिमुकल्याची जबाबदारी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका महिलेने घेतली आहे तर दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ही महिलेच्या निगेटिव्ह मुलाची जबाबदारी दुसऱ्या महिलेने घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here