मुलांच्या छेडछाडीला वैतागून विद्यार्थिंनीने घेतली रेल्वेतून उडी

ched-chad

समस्तीपूर (बिहार) : येथे जनसाधारण एक्सप्रेसमधून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीने (वय २२) छेडछाडीला त्रस्त होऊन चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

रुग्णालयात दाखल झाल्यावर विद्यार्थिनीने सांगितलं की, दुपारी ३.१५ वाजता बरौली जाण्यासाठी ती जनसाधारण ट्रेनमध्ये चढली होती. जिथं ती बसली होती, तिथं ६ मुलं होती आणि ती घाणेरडे कॉमेंट करीत होते. त्यांना नकार दिला तरी ते घाणेरडा स्पर्श करीत असल्याने ती त्यांना खूप वैतागली. अखेरीस या मुलांच्या वागण्याचा खूपच त्रास होत असल्याने ती गेटच्या जवळ आली.

मदतीसाठी तिने घरी फोन केला. त्यावेळी ती मुलं फोन खेचू लागले आणि पुन्हा तिला घाणेरडा स्पर्श करू लागले. ट्रेनमध्ये खूप लोक होते. मात्र कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. काय करावं तिला कळत नव्हतं. म्हणून स्वत:ची इज्जत वाचवण्यासाठी तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here