गुंड अविनाश कांबळेसह तिघांवर मोक्काअंतर्गत कारवाई

arrested

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : कुख्यात गुंड अविनाश कांबळे व त्याच्या टोळीतील तीन सदस्यांवर कोथरुड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली.

गुंड अविनाश कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी स्वत:च्या टोळीचे वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्यासाठी शहर आणि परिसरात दहशत निर्माण केली.तसेच त्यांनी संघटीतपणे आणि स्वतंत्र्यपणे खून,खुनाचा प्रयत्न,गंभीर दुखापत करणे,घातक शस्त्रांच्याव्दारे जखमी करणे,बेकायदेशीर घातक शस्त्र बाऴगणे यांसारखे गंभीर आणि हिंसक गुन्हे केले आहेत.

अविनाश कांबळे (टोळीप्रमुख), रवी बोत्रे,किरण बोत्रे (रा.श्रावणधारा वसाहत,गणंजय सोसायटी,कोथरुड), सुरज ऊर्फ सोन्या राम कुडले (वय ३१,रा.शेडगेआळी,दिवीज रेसिडेन्सी,भूगाव) यांच्याविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून ते जुमानत नसल्यामुळे त्यांचे वर्तन सुधारत नव्हते, त्यामुळे मोकाअंतर्गत कारवाईची परवानगी वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप यांनी पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत प्रस्ताव सादर केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here