सहकारी डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी वैद्यकिय अधिकाऱ्याला एक वर्ष सक्तमजुरी

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : येथील वैद्यकिय अधिकाऱ्याने सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २ जून २०२१ रोजी घडली होती. जितेंद्र वानखेडे असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून, न्यायाधीश डी. एन चामले यांनी गुरुवारी या प्रकरणी निकाल दिला.

आरोपी डॉ. जितेंद्र वानखेडे हा पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने २ जून २०२१ रोजी आपल्याच सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केला. यानंतर याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेच्या दिवशी २ जून २०२१ रोजी पीडित महिला ही ड्युटीवर होती. यावेळी रात्रीच्या सुमारास साडेबारा वाजता डॉ. वानखेडे हा तिथे आला. त्याने त्याच्या बायकोचा वाढदिवस असल्याने काही पदार्थ खाण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी आरोपी हा दारुच्या दशेत होता. म्हणून पीडितेने पार्सल घेतले आणि दार बंद केले.

यानंतर आरोपीने पुन्हा या महिला डॉक्टरला रात्री १ च्या सुमारास फोन केला. आणि तिला व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन यायला सांगितले. त्यावेळी आरोपी हा रात्रभर तिला दारू प्यायला सांगत होता. या संपूर्ण प्रकारला ती कंटाळली. यानंतर तिने पहूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉक्टर जितेंद्र वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी डॉ. जितेंद्र वानखेडेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने काल याप्रकरणी निकाल दिला. यामध्ये न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here