जळगावात दगडाने ठेचून तरुणाची हत्या; दोघे ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरात खून, चोरी, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतांना शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ रात्री उशीरा अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) या तरूणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या मालधक्क्याच्या समोर रात्री उशीरा एका तरूणाची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास करून संबंधित तरूणाची ओळख पटविली असून हा तरुण राजमालतीनगरातील राहिवाशी अनिकेत गणेश गायकवाड असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, खून झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच दारूच्या बाटल्या आढळून आल्यामुळे खून करण्यापूर्वी मयत अनिकेत गणेश गायकवाड याला मारेकर्‍यांनी दारू पाजून मग त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच खूनी हे मयत तरूणाच्या परिचयातील असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते. याबाबत शहर पोलीस स्थानकात अज्ञात मारेकर्‍यांच्या विरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here