पुण्यातील डॉक्टरविरुध्द स्वारगेट पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : क्लिनिकमध्ये साफसफाई करत असताना पाठीमागून येऊन तिला पकडून तिचा डॉक्टरानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रमेश डुमरे यांच्याविरोधात एका ३० वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२२) दिली आहे. हा प्रकार डुमरे यांच्या हिराबाग येथील क्लिनिकमध्ये २२ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रमेश डुमरे यांचे हिराबाग येथे क्लिनिक आहे. तेथे फिर्यादी कामाला आहेत. २२ मे रोजी त्या क्लिनिकमध्ये साफसफाई करत असताना डॉ. डुमरे याने मागून येऊन फिर्यादीस पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. स्वारगेट पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here