मुंबई (प्रतिनिधी)
स्वतःला घडवण्यासाठी किंवा स्वतःचे व्यक्तीमत्व संवर्धनासाठी लहानपणी बुद्धीला पैलू पाडावे लागतात, विचार लहानपणीच केला तर त्याची फळे मोठेपणी चाखायला मिळतात. काही माणसे जन्माने मोठी असतात तर काही प्रयत्नाने, धडाडीने, कष्टानी मोठी होतात असेच सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेऊन अठरा विश्व दारिद्रय नशिबी पुजलेल असताना मेहनत, कल्पनाशक्ती आणि दैदिप्यमान इच्छा या त्रिवेणी संगमाच्या शक्तीने प्रतिकुल परिस्थिती वर मात करत देशाच्या नामांकित अशा प्रशासकीय सेवेत वर्ग एक अधिकारी पदावर झेप घेण्याचा प्रवास करणारे असे नेतृत्व समाज भुषण पुरस्कारने सन्मानित तसेच काही दिवसांपूर्वी सेवा निवृत्त झालेले सामान्यातील असामान्य नेतृत्व म्हणजे डॉ.लक्षराज सानप होय.
दक्षिण भारताची गंगा म्हणजे गोदावरी नदीच्या पवित्र सानिध्यात असणार्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मानोरी गावातील अत्यंत गरीब कुटूंबात म्हणजे अठरा विश्व दारिद्रय नशिबी पुजलेल अशा कुटुंबात जन्म झाला बिकट परिस्थितीशी झुंज देत आणि राष्ट्रसंत भगवान बाबा यांची शिकवण वेळ प्रसंगी जमीन विका पण शिका हा मंत्र त्यांनी वेळोवेळी जपला कारण एकवेळ तर त्यांच्या आईने नाकातील नथ मोडली आणि त्या पैशातून मुंबई गाठली आणि ओळखीतील परिचयाचे असणारे समाजबांधव यांच्याकडे राहुन वेळ प्रसंगी हमाली करत अनेक समस्यांना सामोरे गेले.
तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न..! सर्व सिद्धीचे कारण…
तुका म्हणे निश्चयाचे बळ तेची फळ ही म्हण डॉ.लक्षराज सानप यांना तंतोतंत लागू पडली.
शिक्षण अगदी मेहनत+जिद्द+चिकाटी या त्रिकुटाचे समीकरण बनते म्हणजे घवघवीत यश मिळवणे आणि यासाठी दिवस-रात्र मेहनत करुन त्यांनी यशाच्या पायर्या चढून आकाशाला गवसणी घातली. मुंबई दूरदर्शन येथे वृत्त निवेदक म्हणून काम केले आणि दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज नामवंत यांच्या मुलाखती घेण्याचा भाग्य त्यांना लाभले विधिमंडळमध्ये मुख्यमंत्री, राज्यापाल तसेच देशभरातील अनेक मान्यवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेक मंत्री गण, समाजसेवक यांच्या मुलाखती घेण्याचा योग आला तसेच नंतर दोन तीन ठिकाणी नौकरी करत शेवटी भारत सरकारच्या वर्ग एक अधिकारीपदी निवड झाली आणि प्रचंड मेहनत फळाशी आली भारत सरकारच्या वर्ग एक अधिकारी पदी काम करताना सुद्धा सामाजिक जाणीव जागृती कायम ठेवली आणि वंचित पिडीतांना सहकार्य करण्याची भावना सदैव जपली . तसेच अगदी स्वकर्तृत्वावर महाराष्ट्रात तस देशात नावलौकिक केले सामाजिक कार्य करण्याची गोडी व आवड प्रचंड इच्छाशक्ती आणि अमोघ वाणी हे ब्रह्म अस्त्र म्हणून यशोशिखरावर गाठत काही दिवसांपूर्वी ते भारत सरकारच्या वर्ग एक अधिकारी पदावर वरून सेवा निवृत्त झाले
प्रत्येक माणूस जन्माला येतो तो निसर्गाचे आणि नियतीचे काही दान घेवून जीवन हे आपल्या अंगभूत सामर्थ्याचे जागरण व संवर्धन असते आपल्या अंगाचे सामर्थ्य प्रयत्नपुर्वक वाढवली तर जीवन ही कर्तृत्वाची पौर्णिमा ठरते. कारण की कलेच्या बळावर माणसे घडतात कशी? वाढतात कशी? व किर्तीरुपे मागे उरतात कशी? हे जाणून घ्यायचे असेल तर याचे उदाहरण डॉ.लक्षराज सानप होय. अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते , समाजभुषण पुरस्कार विजेते तसेच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार विजेते, सुप्रसिद्ध दुरदर्शन वाहिनी मुलाखतकार – वृत्तनिवेदक, सेवानिवृत्त वर्ग-1 अधिकारी, संपादक ,साहित्यीक डॉ.लक्षराज सानप सर यांचा उद्या जन्म दिन असल्याने हा विशेष गौरव लेख भविष्यात सुद्धा त्यांच उर्वरित आयुष्य समाजाच्या उत्कर्षासाठी कारणी लागावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना