तारक मेहता का उल्टा चश्मा : दयाबेनच्या घरी पुन्हा हलला पाळणा

disha-wakani

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : तारक मेहता का उल्टा चश्मा शोच्या फॅन्ससाठी गुड न्यूज आहे. दिशा वकानी दुसऱ्यांदा आई झाली आहे. दिशा वकानीने मुलाला जन्म दिलाय. दिशा वकानीला फॅन्स अभिनंदन करत आहेत. दिशाचा भाऊ मयूर वकानी पुन्हा मामा झाल्याने खूप आनंदित आहेत. दिशाचे पती मयूर आणि भावाने या वृत्ताला दुजोरा दिलीय.

फॅन्स दिशा वकानीचे अभिनंदन करत आहेत. भाऊ मयूर वकानी पुन्हा मामा झाल्याने आनंदित आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मयूर वकानीने म्हटले आहे की- मी खूप खुश आहे. २०१७ मध्ये दिशाला कन्यारत्न झाले होते. आता तिने मुलाला जन्म दिलाय. मी मामा झालोय.

दिशा वकानीचा तिचा पती मयूरसोबतच्या फॅमिली फंक्शनचा फोटो डिसेंबर २०२१ मध्ये व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दिशा वकानी बेबी बंपसोबत दिसली होती. दिशाचा हा फोटो तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. बेबी बंप पाहिल्यानंतर दिशा पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. पण, प्रेग्नेंसीबाबत अभिनेत्रीकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही. दिशाचा हा फोटो तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यानचा होता याची पुष्टी आता चाहत्यांना करता आली आहे.

दिशाने २०१७ मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा शोमधून मॅटर्निटी ब्रेक घेतला होता. तेव्हापासून दिशा तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये परतली नाही. २०१९ मध्ये एका एपिसोडमध्ये दिशा वकानीचा लूक दिसला होता. तेव्हापासून ती दिसली नव्हती. दिशाच्या येण्याची आशा आता कमी दिसत आहे. आता दिशा दुसऱ्या मुलामध्ये ती बिझी असेल. अशा परिस्थितीत ती शोमध्ये परतण्याची तरी चाहत्यांना आणखी काही वर्षे वाट पाहावी लागेल, असे फॅन्सचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here