नाशिकमध्ये नातेवाईकानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : मामीच्या बहिणीच्या घरी राहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या नातलगाने प्रेमाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यात पीडिता गर्भवती झाली होती. तिने दिलेल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात बलात्कारासह पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्प येथील पीडिता एप्रिल २०२१ मध्ये तिच्या नातलगांच्या घरी राहण्यास गेली होती. तेथे मामींच्या बहिणीच्या मुलाने पीडितेसोबत प्रेमसंबंध करून दिंडोरी येथे तिच्यावर अत्याचार केले. त्यात पीडिता गर्भवती राहिली. संशयिताने हा प्रकार कोणालाही सांगु नको असे सांगितले. त्यामुळे पीडितेने ही बाब लपवली.

दरम्यान, मंगळवारी (दि.२४) पीडितेस पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने तिच्या आजीने तिला रुग्णालयात नेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समजले व बाळाचा कधीही जन्म होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. त्यामुळे पीडितेस रुग्णालयात दाखल केले असता तिने बाळाला जन्म दिला मात्र अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे बाळाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी हा गुन्हा दिंडोरी पोलिसांकडे वर्ग केला असून दिंडोरी पोलिस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here