शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीचे समन्स

yashwant-jadhav-shivsena

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : शिवसेना नेते यशवंत जाधव यांना समन्स बजावण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते यशवंत जाधव यांना फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) म्हणजेच विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावले, असे आर्थिक गुप्तचर संस्थेने सांगितले आहे.

शिवसेनेचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर, कार्यालये अशा मालमत्तांवर काही महिन्यांपूर्वी प्राप्तीकर खात्याने छापेमारी केली होती. तेव्हापासून प्राप्तीकर खात्याकडून यशवंत जाधव यांच्या मालमत्तेचा तपास सुरु आहे. प्राप्तीकर खात्याने यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रेतील ५ कोटींचा फ्लॅटचा यात समावेश होता.

बिलाकाडी चेंबर्समध्ये ३ खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी यशवंत जाधव यांनी १.१५ कोटी रुपये रोखीने दिल्याचेही प्राप्तीकर खात्याच्या तपासात उघड झाले आहे. सोबतच कोरोनेशन बिल्डींग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डींगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी ३ कोटींहून अधिक रक्कम रोखीने देण्यात आल्याची माहिती समोर आली. प्राप्तीकर खात्याकडून आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here