दोंडाईचा पोलीस स्टेशनला उपचाराअभावी ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल

दोंडाईचा (संतोष कोळी) – परिसरात कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणी रुग्ण आढळून येत आहे त्याच्या परिणाम खेड्या पाड्या वर देखील सुरुवात झाल्याची घटना दिसून येत आहे गेल्या दोन दिवसापूर्वी तावखेडा येथील असेच एक पेशंटच्या रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याने स्वतःहून परिवारासोबत उपजिल्हा रुग्णालय घाठले‌ होते तरीदेखील प्रशासक व डॉक्टर हे यंत्रणा पूर्ण सज्ज करू शकले नाहीत त्याचाच एक भाग आज रोहणे ता शिंदखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एका अत्यवस्थ रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरविले नाही त्यामुळे त्याच्या मृत्यू झाला असा आरोप मृत्यू रुग्णाच्या भावाने केला आहे.
दरम्यान व्यस्थ अवस्थेत आणण्यात आलेल्या रुग्णावर शेवटपर्यंत उपचार केले मात्र रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे धिकार्‍यांचे म्हणणे आहे उपजिल्हा रुग्णालयात रजेश सिंग प्रताप सिंग गिरासे वय 64 रोहाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांना उपचारात दाखल करण्यात आले होते दरम्यान त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ ऑक्सिजन पुरविता आले नाही त्यामुळे त्याच्या मृत्यू झाल्याच्या आरोप रुग्णाचे भाऊ रजेसिंग प्रताप सिंग गिरासे यांनी केला आहे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात करावी अशी तक्रार त्यांनी दोंडाईचा पोलिसात केली आहे.
सोमवारी रात्री उशीरापावतो नगरपालिकेमार्फत रुग्णाचा अंत्यविधी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पत्रकारांनी विचारले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्जुन नरोटे म्हणाले की रुग्णास न्यूमोनिया होता रक्तातील ऑक्सीजन क्षमता फक्त 40 होती रुग्ण अत्यवस्थ असल्याने लगेच ऑक्सिजन लावण्यात आला. रुग्णास तातडीने धुळे जिल्हा रुग्णालय येथे जाण्याचे सांगितले होते लवकर आले असते तर आम्हांला उपचार करता आला असता मात्र उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला असे डॉक्टर अर्जुन नरोटे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here