रायगड येथील बलात्काराच्या मुख्य आरोपीस त्वरित अटक करा- संभाजीराजे दहातोंडे

मुंबई (प्रतिनिधी प्रमिला जाधव) – कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी देण्यात दिरंगाई झाल्याने बलात्कार घटनांची पुनरावृत्ती होत आहे. तांबडी तालुका रोहा जिल्हा रायगड येथे काही समाज कंटकांनी 9 वी इयत्तेत शिकत असलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याच्या संतापजनक प्रकार दिनांक 26 जुलै 2020 रोजी घडला. या पार्श्वभूमीवर बलात्कार प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समनव्ययकांनी 10 ऑगस्ट रोजी तांबडी येथे धडक देत तपास कार्यचा आढावा घेऊन पीडिताच्या कुटुंबियातील सदस्यांचे सांत्वन केले.
कोपर्डी तांबडी सारख्या बलात्काराच्या घटना वारंवार घडण्यात कायद्याची दिरंगाई आणि सरकारी अनास्था कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. तांबडी प्रकरणाचा तपास लवकरात लवकर लावून कोर्टात त्वरित चार्जशीट दाखल करून आणि सरकारने या केसमध्ये विशेष सरकारी वकील ऍड उज्वल निकम यांची लगेच नियुक्ती करावी करून प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्याची मागणी करत आहोत. तसेच एवढी भयंकर घटना घडून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या पीडित कुटुंबाची भेट का नाही घेतली म्हणून सर्वच स्तरावरून संताप व्यक्त करत आहे. तांबडी प्रकरण सरकारने गांभीर्याने घेऊन पीडितास न्याय द्यावा नाहीतर अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा क्रांती मोर्चा मंत्रालयावर 18 ऑगस्ट रोजी तीव्र निषेध करून मंत्रालयास जोरदार घेराव घालणार असल्याची माहिती शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस दिलीपदादा जगताप यांनी गिरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here