मुंबई (प्रतिनिधी प्रमिला जाधव ) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय नामदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या वतीने मुंबई च्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. त्यावेळी कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख श्री. अरुणभाई दुधवडकर, शाखा प्रमुख गोपळ खाडे शिवसेना लॉटरी विक्रेतेचे अध्यक्ष, अंबरनाथ विधानसभा संपर्क प्रमुख श्री. मनोज वारंग सरचिटणीस सिद्धेश पाटील, खजिनदार अविनाश सावंत व तसेच युवासेनेचे अभिजित पाटील व आकर्शिका पाटील उपस्थित होते.







