जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरातील संवेदनशील परिसर समजल्या जाणा-या तांबापुर भागातील दंगलीतील पोलिसांना हवा असलेल्या . रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (रा. अजमेरी गल्ली, तांबापुरा जळगाव) या आरोपीस अटक करण्यात आली आहे
गुन्हा घडल्यापासून रिजवान हा फरार होता. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रिजवान याच्यावर एकुण विस गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपार देखील करण्यात आले होते. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्याला शिताफीने अटक करण्यात आली आहे.
सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, मुकेश पाटील, सचिन पाटील, किशोर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.







