जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरातील सुप्रीम कॉलनीतील देशी दारूचे गोडाऊन फोडून त्यातील २ लाख १५ हजार ५१० रुपयांची रोकड चोरणा-या त्रिकूटास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे.
अमन उर्फ खेकडा रशिद सैय्यद (वय- २०), शेबि खान चांद खान, (वय-१९) रा. रामदेव बाबा किराणा जवळ सुप्रीम कॉलनी जळगाव व उमेश उर्फ भावड्या संतोष पाटील अशी अटकेतील तिघांची नाव आहेत. सुप्रीम कॉलनीत भुपेश कुलकर्णी चालवत असलेल्या देशी दारु दुकानाच्या गोडाऊनमध्ये २५ मार्च व २६ मार्च दरम्यान रोख रकमेची चोरी झाली होती.
एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हाच्या तपास दरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन ऊर्फ केखडा रशीद सैय्यद व त्याचे साथीदार उमेश उर्फ भावड्या संतोष पाटील व शबि खान यांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलिस पो.ना सैय्यद इमरान यांना समजली.
आरोपी अमन उर्फ केखडा, रशीद सैय्यद या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारविरुद्ध यापूर्वी चोरीचे १० गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, यांचे मार्गदर्शनखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना सैय्यद इम्रान अली, सुधीर सावळे, सचिन पाटील, सतीश गरजे, मी.पो.ना नीलोफर सैय्यद, आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास पोलीस हे.कॉ रामकृष्ण पाटील करत आहे







