अवैध दारू विक्रीमुळे पानवडोद बसस्थानक परिसरात दारुड्याचा झिंगझिंग झिगाट गोंधळ

Drinking-spree-in-Panwadod-bus-stand-area

सिल्लोड (प्रतिनिधी संजय दांडगे) : अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्यामुळे सकाळपासून पानवडोद येथील बस स्थानकावर दारुड्याचा दारू पिऊन झिंगाट तमाशा सुरू असतो . दारुड्याच्या झिंगाट तमाशामुळे महिला व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंडी टपऱ्या टाकून या टपऱ्यांमध्ये अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे .अवैध दारू विक्रीवर कोणाचाही धाक उरलेला दिसत नाही .ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने अजिंठा पोलिसांना व पोलिस अधीक्षक ग्रामिण कार्यालयाला वारंवार पत्राद्वारे कळविण्यात आले. तरी देखील संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई न करता ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेल्या पत्राला केराची टोपली दाखविल्यामुळेच या गावात अवैध दारूचा धंदा चांगलाच फोफावला आहे .

 

आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामसभेत ठराव घेऊन गावात सुरु असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय व अजिंठा पोलीस ठाणे यांना पत्रव्यवहार केला आहे .आम्ही अवैध दारू विक्रेत्यांची सर्व माहिती त्यांना देऊ शकतो असे देखील सांगितले आहे .तरीदेखील अवैध धंद्यावर कुठलीही कारवाई केली गेले नाही .हे धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अन्यथा ग्रामस्थाच्या वतीने लवकरच लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल .
– समाधान गायकवाड
ग्रामपंचायत सदस्य, पानवडोद

पानवडोद येथे दहा ते बारा ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असून जागोजागी देशी दारू उपलब्ध होत असल्याने युवा पिढीदेखील व्यसनाच्या आधीन होत आहे . वेळीच अवैध दारू विक्रीला लगाम घातला गेला नाही तर अजून या परिसरात अवैध दारूची दुकाने वाढू शकतात.

बसस्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या महिलांनादेखील या दारुड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. रोज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दारुडे दारू पिऊन बस स्थानक परिसरात झिंगाट चाळे करीत असतात. यामुळे महिला व विद्यार्थ्यांसाठी ते असहनीय झाले आहे.अवैध दारू विक्रेते व पोलिसांमध्ये साटेलोटे असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात येत आहे .


grampanchyat-nivedan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here