काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या

siddhu-moosewala

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले लोकप्रिय पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूस वाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मूस वाला यांनी मानसातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा ‘आप’चे डॉ. विजय सिंगला यांनी ६३, ३२३ मतांनी पराभव केला होता.

मूळचे मानसा जिल्ह्यातील मूसा या गावातील, मूस वाला यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना मानसा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिल्याने, तत्कालीन मानसाचे विद्यमान आमदार, नजर सिंग मनशाहिया यांनी वादग्रस्त गायकाच्या उमेदवारीला विरोध करणार असल्याचे सांगत पक्षाविरुद्ध बंड केले होते. त्यामुळे ते खूप चर्चेत आले होते.

त्याच्या मृत्यूमुळे पंजाब काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर एकूण ३० हून अधिक राऊंड फायर करण्यात आले होते. या हल्ल्यात अजून दोघेजण जखमी झाले आहेत. मूस वाला यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here