रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना भरधाव ट्रकने उडवले

Workers-on-the-road-were-blown-away-by-a-load-truck

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरात एका भरधाव ट्रकने रस्त्यावर पट्टे मारत असलेल्या कामगारांना उडवल्याची घटना पहाटेच्या सुमाराला समीर लॉन्सजवळ घडली आहे. यामध्ये एक कामगार जागीच ठार झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी आहेत. जखमी कामगारांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार राजस्थानचे असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून रावेत पोलिस पुढील तपास करत आहेत.

पहाटे रस्त्यावर पट्टे मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी चार कामगार काम करत होते. हे काम पिंपरी येथील रावेतच्या समीर लॉन्स जवळ सुरू होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तीन कामगारांना उडविले. त्यावेळी एका कामगाराचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. संबंधित ट्रकचा चालक तिथून पळून गेला असून पोलिस चालकाचा शोध घेत आहेत. जखमी झालेल्या कामगारांवरती वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार कामगार काम करीत होते. त्यावेळी ट्रकने उडविल्याने अपघातात साजीद खान (वय २५) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जबर जखमी झाले आहेत. संदीप कुमार, प्रल्हाद यादव, भोला कुमार, अनिल कुमार अशी जखमींची नावे आहेत. ह्या चारही जखमीच्या अंगावर गरम पेंट सांडल्याने भाजून गंभीर जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here