ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : मांडा येथे पती-पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अशोक भोसले (५५), विजया भोसले अशी त्यांची नावे असून ही हत्या नेमकी कोणी व का केली हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी संशयावरून मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करण्यात येत आहे.
मांडा येथील पंचवटी चौकनजीक असलेल्या साई दर्शन इमारतीत भोसले दाम्पत्य राहते. आज संध्याकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली, ही माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले.
दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच हत्येचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. ही हत्या कोणी व कशासाठी केली याचा शोध पोलीस घेत असून या प्रकरणी भोसले यांचा मुलगा अनमोल याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.






