जळगाव (क्राइम रिपोर्टर अस्लम खान) : येथील शिवाजीनगरातील सारा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट नावावर करुन देत नसल्याच्या कारणावरुन हाणामारी झाली.
पत्नीने व तिच्यासोबतच्या एका व्यक्तीने पतीला मारहाण करुन काठीने डोके फोडले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोज ज्ञानेश्वर मेश्राम (रा. शिवाजीनगर, हल्ली मुक्काम टी. व्ही. सेंटर औरंगाबाद) यांनी फिर्याद दिलेली आहे.
सपना रामकृपाल श्रीवास्तव (रा. शिवाजीनगर) ही महिला त्यांची पत्नी आहे. मेश्राम हे तिच्या नावावर फ्लॅट करुन देत नाहीत. या कारणावरुन सपना हिच्यासह योगानंद कोळी या दोघांनी त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. कोळी याने त्यांच्या डोक्यावर काठीने मारुन दुखापत केली. तू घरात रहायचे नाही, असा दम दिला.






