पुणेकरांना कोट्यावधीचा ‘चुना’ लावणाऱे कापगते दांम्पत्य जेरबंद

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हिेतेंद्र पाटील) : शेअर्स मार्केटमधून चांगला परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून पुण्यातील नागरिकांना कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील साकोलीच्या कापगते दांपत्याला पुणे पोलिसांनी रायपुर येथून जेरबंद केले.

शेअर्स मार्केटमध्ये चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवत डॉ. नाशिक कापगते व त्याची पत्नी आशा कापगते या जोडीने आधी साकोली व त्यानंतर पुण्यातील अनेकांना कोट्यावधीचा चुना लावला. फरार झालेल्या साकोली तालुक्यातील या जोडीला पुणे पोलिसांनी शुक्रवारी रायपूर येथून अटक केली.

या जोडीने पुणे येथे जाण्यापूर्वी साकोली परिसरातील अनेकांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांनी गंडविल्यानंतर फरार झाले होते. त्यानंतर त्यांनी आपले बस्तान पुणे शहरात मांडले. २०१७ पासून पुणेकरांना शेअर्स मार्केटमध्ये दामदुप्पट परतावा देतो म्हणून फसवणुकीचा धंदा सुरु केला. पुण्यात फसलेल्या गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

मागील नऊ महिन्यापासून पुणे पोलीस या जोडीच्या मागावर होते. डॉ. नाशिक कापगते याने २०१७ पूर्वी साकोली परिसरातील अनेक जणांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये गोळा केले. सुरुवातीला नियमितपणे परतावा दिल्यामुळे लोकांचा विश्वास बसला. नंतर पुराव्यांअभावी तक्रारदाराच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नव्हती.

२०१७ मध्ये साकोली पोलीस ठाण्यात काही लोक फसवणुकीची तक्रार घेऊन गेले होते परंतु पुरावे नसल्याने तक्रारी दाखल झाल्या नाहीत. चेक बाऊन्सचे प्रकरण गुन्हे शाखेच्या अंतर्गत येत नसल्याने सरळ कोर्टात गेले. तेथून संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर अनेकदा नोटीस पाठवण्यात आली. मात्र, डॉ. नाशिक कापगते पत्त्यावर राहत नसल्याने नोटीस कोणीही न स्विकारल्याने काही वर्षानंतर कोर्टाने हे प्रकरण रद्द केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here