विठ्ठलवाडी एसटी डेपोत कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : उल्हासनगरजवळील विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्येच एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडली तेव्हा हा कर्मचारी कामावर होता. सचिन कदम असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो या आगारात मेकॅनिक म्हणून काम करतो. एसटी संपात कदमदेखील सहभागी झाले होते. त्याच रागातून आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सचिन यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या त्रासाला कंटाळून अखेर सचिनने झोपेच्या प्रमाणापेक्षा जास्त गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याआधी त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव नमूद करत पत्र लिहीले होते.

सचिनसह इतर कर्मचाऱ्यांनादेखील याच कारणावरून त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मेकॅनिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी संपात सहभागी झाल्याचा राग मनात धरून सचिन यांना मानसिक त्रास देतात असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. कदम यांनी झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची बाब इतर एसटी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ उल्हासनगरमधील रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here