शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव महानगरतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर

shivsena-jalgaon

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव महानगर व शिवाजीनगर शिवसेनेतर्फे विजय संजय राठोड यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरिकांसाठी “मोफत नेत्र तपासणी शिबिर” आयोजित करण्यात आले होते. शिबिरात आज प्रभागातील जवळपास ११० ते १२० नागरिकांची तपासणी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ.जयश्रीताई महाजन व शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख श्री विष्णूभाऊ भंगाळे व महानगरप्रमुख श्री शरदभाऊ तायडे तसेच विभागातील समन्वयक अंकुश कोळी,विभाग प्रमुख विजय भांदल,माजी नगरसेवक संजय राठोड,कार्यालय प्रमुख संजय सांगळे,अमोल सांगोरे, अॅड. सत्यजित पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश व्यास, गणेश मोजर, सोहम विसपुते,समीर खाटीक उपस्थित होते.

शिबिराला डॉ.शरद पवार व नितीन गोहील(विनायक ऑप्टिकल),विशाल वाघ,गणेश अंभोरे,दीपक नाझरकर,भरत कोचुरे,मयूर गवळी,छोटू परदेशी,रोहित पवार,प्रवीण पगारे,उमर शेख प्रमोद पाटील,घनश्याम लोहार,योगेश पाटील,शुभम ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाची प्रस्तावना समाधान पाटील व आभार पंकज व्यास यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here