जळगाव (संपादक सुनिल पाटील) : आज दि .१९/०६/२२ रविवार रोज़ी शिवसेने चें ५६ वा वर्धापनदिनानिमित्ताने महाराष्ट्राचें मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आशीर्वाद घेउन,पाणि पुरवठा मंत्री व जळगांवचें पालकमंत्री मा.गुलाबरावजी पाटील यांचे आदेशनुसार व युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांचे मार्गदर्शाना ख़ाली व शिवसेना जळगांव ज़िल्हा प्रमुख मा.विष्णूभाऊ भंगाळे व महानगर प्रमुख मा शरद आबा तायडे यांचे सुचनेनुसार व युवासेना उपज़िल्हा युवा अधिकारी पियुष संजयकुमार गांधी यांचे सहकार्याने आज कामगारांना रूमाल व गमछे वाटप करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे युवासेना विस्तारक किशोरजी भोसले व युवासेना उपमहानगर युवा अधिकारी हितेशभाई ठाकरे उपस्थित होते
या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शिवसेना बळीराम पेठ शाखा व युवासेना जळगाव शहर यांचा योगदान होता. यावेळी कार्यक्रमास माजी विभाग प्रमुख विपिन पवार आकाश पाटील, विक्की पाटील, अनिल गवळी, शाखाप्रमुख निर्भय पाटील ,महेश पाटील, दिनेश वाणी ,प्रकाश बापकर ,जगन गवळी सतीश गवळी सोनु गवळी,संजय राठोड असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.







