नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील किरण पुराने या घंटागाडी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी किरण पुराने या कर्मचाऱ्याने घंटागाडी सुपरवायझर आपल्याकडे ठराविक रक्कमेची मागणी करत असल्याचा संदेश व्हाट्सअपवर शेअर केला आहे. इतकेच नव्हेतर किरणने आत्महत्या यामुळेच करत असल्याचे देखील लिहिले आहे.
सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने नाशिक शहर हादरले आहे.







