वर्डी ग्रामप्रशासनाने तीन वर्षांपासून बंद पडलेली पाणी पुरवठा योजना केली अखेर पूर्ण

vardi-water-suply-start-again

चोपडा (प्रतिनिधी रविंद्र कोळी) : वर्डी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच, तसेच सदस्य यांच्या अथक प्रयत्नाने राष्ट्रीय पेय जल योजना ह्या योजनेअंतर्गत चौकीजवळ व मंगरूळ रस्तालगत दोन ठिकाणी बोअरिंग करण्यात आली होती, काही वर्षे ह्या बोअरिंग सतत गावाला पाणी पुरवठा करीत होत्या,

कोरोना काळात गावात प्रशासक बसल्याने ह्या बोरींग बंद पडल्या, त्या ठिकाणचे विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद पडल्या त्या चोरीला गेल्या, यावल रोडवर नवीन पेट्रोल पंपधारकांनी पाईपलाईनचा मार्ग वडवला तसेच पाईपलाईन च्या मार्गाने कित्येक शेतकऱ्यांनी स्वताच्या कामासाठी पाईपलाईनला खंड पाडला, अश्या अनेक समस्यांना तोंड देऊन, सरपंच सौ ललीताताई दतात्रय पाटील यांच्या प्रयत्नात सरपंच पती दतात्रय पाटील व कर्मचारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांच्या अथक परीश्रमाने वर्डीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला,

वर्डी गावाला ग्रामसेवक नसतांना दीड महीन्यात अनेक कामांचा सपाटा सुरु आहे, त्यात कित्येक वर्षांपासून गटारी निघाल्या नव्हत्या त्या तड लागेल तोवर काढल्या, दिवाबंत्ती, तसेच गावाला पाणी टंचाई भासनार नाही त्यावर लक्ष दिले, ग्रामसेवक नसतांना सरपंच व सहकारी यांच्या मदतीनें गावाचा कारभार सुरु आहे, ह्या बोअरिंग सुरु करण्यासाठी जे काही मटेरीयल लागेल ते गावातील मनोहर पाटील, चंपालाल पाटील यांनी स्वतः जाउन फिटिंग करून पाणी पुरवठा सुरळीत केला, विद्युत डिपी चोरीला गेल्यामुळे सबस्टेशनचे अभियंता पंकज बाविस्कर, रॉकी कोळी यांनी लागलीच ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था करून दिली, ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी अभीमन पाटील, लिपीक विश्वास शिंदे, भिमराव पाटील, संदीप पाटील यांनी सतत १५ दिवस काम पार पाडले तसेच यांच्यावर विश्वास ठेऊन दतात्रय पाटील यांनी हाती घेतलेले काम कविश्वर पाटील, महारू धनगर, उमाकांत चव्हाण, नंदलाल शिंदे, देवेंद्र पाटील, महेंद्र सर, लहुश नायदे इरपान तडवी, अभय पाटील यांच्या मदतीने पूर्ण केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here